Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
CT, PT, Metering Cubical हे शब्द नेहमीच आपल्या वापरात येतात, या blog मध्ये आपण त्यांच्या बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत,
CT PT ही दोन्ही करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी ची उपकरणे आहेत. CT PT चा उपयोग अश्या ठिकाणी करतात जिथे करंट आणि वोल्टेज चे प्रमाण जास्त असते, CT PT चे मूळ काम हे हाय करंट आणि हाय वोल्टेज कमी करून पैरामीटर्स हे देणे आहे ज्याच्या मदतीने मोठया प्रमाणात वाहणाऱ्या करंट आणि वोल्टेज ला सोप्या पद्धतीने मेजर करू शकतो.
सी टी CT म्हणजे करंट ट्रांसफार्मर जिचे काम इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये वाहणारा ज्यादा (हाय ) करंट ला कमी करणे हे आहे.
ज्यावेळी आपल्याला सिस्टीम चा करंट चेक करायचा असतो त्यावेळी आपण ज्या मेजरींग डिव्हाईस वापरतो त्याला पण maximum चेक करण्याच्या लिमीटेशन असतात आणि त्यानंतर जर आपल्याला करंट चेक करायचा असल्यास आपल्या कडे CT (Current Transformer ) हा एकमेव मेजरींग डिव्हाईस चा पर्याय शिल्लक राहातो.
साधरणपणे CT PT ह्या Indoor/ Outdoor type मध्ये विभागल्या जातात, Indoor Type ज्या Panel मध्ये Cubical मध्ये लावलेल्या असतात व Outdoor type ज्या बाहेर Pole वर लावलेल्या आसतात किंवा Gantry Tower वर लावलेल्या आसतात.
1) Wound Type CT
2) Bus Bar Type CT
3) Window Type or Ring Type CT
CT ह्या HT ,LT या दोन्ही प्रकारात उपलब्ध आसतात, तसेच त्यांच्या वापरावरून व Construction design ते पुन्हा Resin Cast Expoxy Type, Oil Cooled Type, tape type या मध्ये विभागल्या जातात.
प्रत्येक CT ला एक CT रेशिओ असतो, हे तर आपल्याला माहित आहे की CT ही करंट कमी करून देणार, CT किती करंट करून देणार हे त्या CT रेशिओ वर आधारभूत असते.
CT ratio - नेहमी हा एकतर 5 Amp असतो किंवा काही ठिकाणी 1 Amp असतो,
जर CT रेशीओ 300/5 असेल तर 300 Amp प्रायमरी फुल लोड करंट जाईल तेव्हा secondary current हा 5 Amp दाखवेल दुसऱ्या बाजूला . नेहमी येणारे करंट इनपुट बदलते तेंव्हा निश्चितच सेकंडरी आऊटपुट आपोआपच बदलते , चला दुसऱ्या उदाहरणावरून समजून घेऊ
या ठिकाणी आपली CT ज्याचा CT ratio - 300/5 आहे ती सेम ठेवली आणि त्या ठिकाणी 300 amp ऐवजी 150 Amp करंट फ्लो केला तर सेकंडरी आऊटपुट 2.5 Amp असेल.
नेहमी CT Ratio selection करताना आपल्या युनिट चा फुल लोड करंट किती आहे या वरुन करण्यात येतो, खुप जास्त लोड व CT Ratio यांच्यात अंतर असेल तर जेव्हडी accuracy अपेक्षित आहे तेव्हडी मोजली जात नाही.
Class of Accuracy - क्लास ऑफ Accuracy हे CT चे अचुकतेचे मापदंड आहे, 0.1, 0.2, 0.5, 1, 3 and 5 for metering CT असे क्लास असतात, तसेच 5P10, 10 P, 5P20. अश्या प्रकारे क्लास हा
Protection CT मध्ये असतात. सध्या काही ठिकाणी "S" क्लास चा पण उपयोग होताना दिसतो, "S" क्लास म्हणजे Sustain क्लास आहे जो अत्यंत एक्यूरेट मानला जातो.
बर्डन हे नेहमी secondary वर जोडल्या जाणाऱ्या मेटेरिंग तसेच मॉनिटरिंग devices वर अंतर्भुत असते, हे नेहमी "VA" मध्ये गणले जाते, 10 VA, 15 VA, 50 VA अशे बर्डन आपल्याला CT PT वर बघायला मिळते.
CT करंट ट्रान्सफॉर्मर ह्या मुख्यतः दोन प्रकारात येतात
१) मेटेरिंग CT
२) Protection CT
मेटेरिंग CT या सिस्टम मध्ये मीटर रिडींग करण्यासाठी वापरतात तसेच Protection CT ही नेहमी सिस्टम protection साठी वापरली जाते,
PT म्हणजे पोटेंशनल ट्रांसफार्मर जो हाई वोल्टेज ला कमी करून आपल्याला आउटपुट वोल्टेज कमी करून देतो. पीटी चा उपयोग हा हाई ट्रान्समिशन लाइन मध्ये केला जातो. कारण हाई ट्रान्समिशन लाइन मध्ये उच्च व्होल्टेज चा वापर केला असतो
आपल्याला हे माहिती आहे की कोणत्याही वोल्ट मीटर ने 33 किलो वोल्ट किंवा त्यापेक्षा ज्यादा 2 लाख 20 हजार KV चा वोल्टेज चेक करु शकत नाही,
ह्या ठिकाणी पि टी (PT) चा उपयोग करुन त्या हाई वोल्टेज ला कमी वोल्टेज मध्ये बदल करुन घेता येते, त्यानंतर आपण पी टी (PT) पासुन निघणाऱ्या वोल्टेज ला वोल्टमीटर च्या मदतीने मेजर करु शकतो.
यामध्ये पण CT प्रमाणेच प्रणाली काम करते जर पिटी (PT) आहे आणि त्याचा रेश्यो 11000/110 आहे, त्याठिकाणी याचा अर्थ PT 11000 वोल्टेज ला 110 वोल्टेज मध्ये बदल करून आउटपुट देत असते.
PT Ratio-11000/110
Sr. No. | Current Transformer (CT) | Potential Transformer (PT) |
1 | CT स्टेपअप ट्रांसफार्मर असते. | PT स्टेप डाउन ट्रांसफार्मर असते. |
2 | करंट ट्रांसफार्मर CT चा उपयोग करंट ची वैल्यू मोजण्यासाठी करतात, | पोटेंशनल ट्रांसफार्मर PT चा उपयोग वोल्टेज मोजण्या करता करतात |
3 | CT ला सीरीज मध्ये जोडण्यात येते | PT ला पैरेलल मध्ये सिस्टम बरोबर जोडले जाते |
4 | CT RATIO ची रेंज ही 1 एम्पेयर आणि 5 एम्पेयरमें मध्ये येते | PT RATIO ची रेंज 110 वोल्टेज मध्ये येते |
5 | CT पासुन निघालेल्या आउटपुट पैरामीटर ला आपण एम्पेयर मीटर च्या साह्याने जोडतो (मोजतो ) | PT च्या आउटपुट ला वोल्ट मीटर ने जोडतो |
6 | CT Symbol |
PT Symbol |
7 |
Metering Cubical हे एक इनडोअर पॅनेल असते ज्या मध्ये Resin Cast, Epoxy Dry Type CT PT या जोडलेल्या आसतात, या पॅनल चा अंतिम उद्देश हा मीटर ला संलग्न करुन येणारे मीटर रिडींग दर्शिवने हे आहे.
HT Metering Cubical मध्ये 3 CT आणि 3 PT या जोडलेल्या आसतात, सहजरित्या मीटर रिडींग करता येईल अशी मीटरची रचना असते,
CT PT Metering Cubical या सर्वांना Perfect Earthing करणे व योग्य लाइटिंग अरेस्टर चा वापर करणे नेहमी फायद्याचे ठरते
Balaji Engineers ,Kolhapur हे CT PT, Metering Cubical याचे Huphen या कंपनीचे Authorized Dealer Kolhapur ,Ratnagiri and Sindhudurg या जिल्ह्यांसाठी Dealer आहोत. तसेच Replacement of CT PT in Metering Cubical, व erection of Metering Cubical (CTPT ) इत्यादी services पुरवतो.
Please Contact for any query about CT PT and Metering system to below mail and Phone no.