Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
Connected Load - सोप्या भाषेत समजायचे झाले तर कारखान्यातील जोडणाऱ्या किंवा उपयोगात आणणाऱ्या सर्व मोटर्स / मशिनरी / लाइटिंग इत्यादी चें आपण लोड वयक्तिक एकत्रित पणे बेरीज केली तर येणारा संपूर्ण लोड हा असतो Connected Load .
Maximum Load - - कारखान्यातील जोडलेल्या सर्व मोटर्स / मशिनरी / लाइटिंग इत्यादी चा लोड जेव्हा जास्ती जास्त वाढलेला असतो तेव्हा तो लोड हा Maximum Load म्हणून मीटर मध्ये काउन्ट केला जातो . मीटर हे नेहमी जास्त टप्पा पार केलेल्या लोड ची नोंद स्वतःकडे करत आसते .
M D Controller हे उपकरण कारखान्यात बसवणे फायद्याचे ठरते, या द्वारे जर जास्तीचा लोड वापरला जाऊ लागला तर हे डिवाइस त्याला सेन्स करून काही पार्ट लोड बंद करते व आपला लोड Maximum Load च्या वर जाऊन जी पेलेन्टी बसणार होती त्यापासून आपला बचाव करते. M D Controller विषयी नेहमी जागृक राहणे हे फायद्याचे असते.
जुन्या पारंपरिक मशिनरी ह्या जास्ती इलेक्टिकल लोड घेतात व आउटपुट त्या मानाने कमी देतात ,आशा सगळ्या पारंपरिक मशिनरी चे सर्वेक्षण करून त्या बदली लेटेस्ट high Speed low Power consumption मशिनरी बसवणे फायद्याचे ठरु शकते.
Production and Planning डिपार्टमेंट सोबत चर्चा करून जर कारखान्यातील चालु लोड हा दीर्घ काळासाठी कमी प्रमाणात लागणार असेल तर हा लोड इलेकट्रीकल बोर्डा कडून कमी करता येऊ शकतो जेणेकरून जो ठराविक दंड इलेकट्रीकल बोर्डाचा लागणार होता त्यातून मुक्तता होऊ शकते.