Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
प्रथम हे समजून घेऊ की, आपण कोणतेही डिव्हाईस चालवायचे असल्यास त्याला वायरशी जोडतो आणि त्याला सप्ल्याय देतो , आता आपण जेव्हा डिव्हाईस चालू करतो, तेव्हा आपले व्होल्टेज आणि करंट दोन्ही त्या वायरमधून डिव्हाइसमध्ये जातात हे आपणांस ढोबळमानाने माहित आहे,
आपण व्होल्टेज आणि करंटचे नाव ऐकले असेलच, फक्त याठिकाणी हे समजून घेणे फार महत्वाचे आहे कि कोणताही सप्लाय डिव्हाईस चालू करण्यासाठी सुरु केला तर व्होल्टेज आणि करंट हे एकाच वायर मध्ये साथ साथ जाण्यास स्वतःची मुव्हमेंट चालू करतात.
आता आपल्याला हे समजले आहे कि व्होल्टेज आणि करंट दोन्ही ही वायरमधून एकत्रितपणे मार्गक्रमण करतात, ते जाताना का WAVEFORM (वेव्हफॉर्म) तयार करतात. आपण फोटो मध्ये बघू शकता
जेव्हा दोघांच्या वेव्हफॉर्म एकत्र सुरु होऊन तसेच येऊन एकत्र संपतात, ती पोसिशन (परिस्तिथी ) ही उत्तम अशी मानली जाते ,त्या वेळेस आपला पॉवर फॅक्टर 1 असतो आणि त्याला युनिटी पॉवर फॅक्टर ( चांगला पॉवर फॅक्टर ) म्हणतात.
त्या वेव्हफॉर्म मध्ये आंतर असते (म्हणजेच व्होल्टेज आणि करंट यांच्या मार्गक्रमण च्या पोसिशन मध्ये आंतर असते ) या एकूण परिस्थितीला खराब पॉवर फॅक्टर म्हणतात उदा 0.6,0.7,0.8 , इत्यादी .
उत्तर आहे हे होते आपल्या वेगवेगळ्या भारांमुळे ( इलेकट्रीकल लोड मुळे ).
१) युनिटी पॉवर फॅक्टर - युनिटी पॉवर फॅक्टरमध्ये, आपला पॉवर फॅक्टर 1 आहे, म्हणजे आपल्या व्होल्टेज आणि करंटचा वेव्हफॉर्म एकाच वेळी सुरू होतो आणि एकाच वेळी समाप्त होतो. हा सर्वोत्कृष्ट पॉवर फॅक्टर समजला जातो
२) लॅगिंग पॉवर फॅक्टर (Lagging Power Factor) - हा पॉवर फॅक्टर सर्वात खराब पॉवर फॅक्टर मानला जातो, या मध्ये दोन्ही वेव्हफॉर्म एकत्र जात नाहीत व त्या वेव्हफॉर्म मध्ये आंतर असते, हा पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी आपल्याला कपॅसिटर हे सिस्टम मध्ये जोडावे लागतात.
३) लिडिंग पॉवर फॅक्टर (Leading Power factor )- मित्रांनो लिडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे जेव्हा आपण आवश्यकते पेक्षा जास्त कॅपेसिटर जोडतो तेव्हा आपला पॉवर फॅक्टर = -0.9 -0.8 सारख्या वजा मध्ये येत असतो
ह्या ब्लॉग मध्ये आपण पॉवर फॅक्टर म्हणजे काय असते हे बघितले, येणाऱ्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या फ़ॅक्टरीतील पॉवर फॅक्टर कसा सुधारावा व पॉवर फॅक्टर आपल्या इंडस्ट्री ला कसा परिणाम करतो ते बघणार आहोत,