Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
इंडस्ट्री मध्ये आपण AC / DC / Special type आश्या मोटर्स पाहतो. मोटर्स हा कंपोनंन्ट अतिशय महत्वाचा आणि तसेच खुप मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा आहे .काही कारखान्या मध्ये एकुण लोड च्या ७० % किंवा त्यापेक्षा जास्त चा लोड हा मोटर च्या लोड नी व्यापलेला असतो.मोटर्स आंनदाने चालु असतील तर सम्पूर्ण कारखाना आनंदाने चालु आहे असे म्हणता येईल. मोटर्स च्या देखबाली कडे दुर्लक्ष करणे हे आर्थिक द्रुष्ट्या फार महागात पडते . मोटर्स चा सबंध हा थेट कारखान्यातील प्रोडक्शन वर असतो त्यामुळे जर योग्य प्रमाणात मेंटन्स चे शेड्युल तयार करुन त्याची आमंलबजावणी केली तर वेळेची तसेच आर्थिक बचत होऊ शकते व मोटर्स ची लाईफ व इफिसिएन्सी (Efficiency) वाढु शकते . मेंटन्स शेड्युल हे नेहमी कोणत्या टाईप ची मोटर आहे व सध्याची तिची स्थिती काय आहे यावर आवलंबून असावे.
मोटर च्या जवळ खुप मोठ्या प्रमाणात व्हयबरेशन आहे का ते तपासणे. बेरिंग, अलायमेन्ट तसेच फौंडेशन बोल्ट इत्यादी चेक करणे.
मोटर च्या जवळ खुप मोठ्या प्रमाणात आवाजा मध्ये बदल झाला आहे का ते तपासणे. कपलिंग्स, गेअरबॉक्स, अलायमेन्ट, बेरिंग याचे निरीक्षण करणे.
तापमान वाढले असल्यास मोटर ही सखोल तपासणीची दिशा दर्शवते . त्याचे व्हेंटिलेशन चेक करुन मोटरला हवा व्यवस्थित मिळते का हे पहाणे महत्वाचे ठरते.
Motor 's Loose Connection (लुज कनेक्शन ) - मोटरच्या एरिया मध्ये Vibration मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे लुज कनेक्शन चे निरीक्षण करणे फायद्याचे ठरते मोटर मध्ये तसेच पॅनेल मध्ये सुद्धा.
Carbonized wire (कार्बन आलेली वायर ) - ऑपरेटर ला कार्बन वायर ही पहाणे गरजेचे आहे कारण तीन पैकी एका वायर ला कार्बन आला असेल तर आपली मोटर ही फक्त दोन Phase वर चालेल आणि मोटर जळण्याची शक्यता वाढेल.
ऑइल आणि लुब्रिकेशन लेव्हल - यामध्ये ऑइल , ग्रेसींग हे बघणे बेरिंग व गिअर बॉक्स महत्वाचे ठरते , या मुळे मोटर चे ओव्हर हीटिंग आटोक्यात येऊ शकते .
डस्ट आणि ऑइल जवळ सांडले आहे का पहाणे.
Motor's Cooling Fan - मोटरचा कुलिंग फॅन हा फार महत्त्वाचा घटक असतो , जर तो खराब झाला किंवा व्यवस्थित काम करेना झाल्यास तो ताबोडतोब action घेऊन रिपेरीं अथवा रिप्लेस केला पाहिजे जेणेकरून आपल्या मोटर च्या Winding ला धोका पोहचुन मोटर बंद पडण्याची शक्यता टाळता येते.
Heating - या मध्ये आपली मोटर प्रमाण पेक्षा जास्त गरम होत नाही ना हे पाहणे गरजेचे ठरते . यामध्ये Voltage कमी किंवा जास्त मिळते तसेच लुज कनेक्शन आहे का याची खातरजमा करावी.
Motor's Current checking - (करंट तपासणे ) - मोटर चा करंट चेक करणे व करंट unbalance झाला आहे का ते पहाणे महत्वाचे असते.
Air Gap - यामध्ये आपण वायरचा लग व्यवस्थित नसेल तर तो नवीन बसवून सुरळीत करता येईल.
मोटर मधील महत्वाच्या पार्ट मधील एक आहे तो म्हणजे बेरिंग हे आहे, बेरिंग चेकिंग करणे व गरज असल्यास ते बदलणे प्रत्येक बदलाव्याची तसचे बदलेल्या तारखेची नोंद ही Motor History ( मोटर चा पूर्ण माहिती तक्ता सीरियल नं सहित ) या मध्ये करणे गरजेचे असते. बेरिंग्स ना ग्रेसींग योग्य वेळी योग्य प्रमाणात केले तर मोटर बेरिंग्स ड्राय होऊन जळण्याचा धोका कमी होतो.
(हे टाळावे - खूप जुने लुब्रिकेंट्स, कमी किंवा जास्त प्रमाणात लुब्रिकेंट्स वापरने, धूळ, घाण असणारे लुब्रिकेंट्स मोटर ला वापरणे )
मेगरची टेस्ट ही घेऊन इन्सुलेशन बरोबर आहे का तसेच Resistance (रेजिस्टन्स ) unbalance नाही ना याची खात्री करुन घेता येते. वाइंडिंग ची स्थिती यावरून आपल्या लक्षात येते.
या मध्ये सर्व कनेक्शन कंट्रोल चे तसेच पॉवर चे चेक करुन घ्यावेत ज्या मुळे मोटर चे जीवनमान वाढेल.
आपण लावलेल्या रिलेचे टेस्टिंग करुन तो व्यवस्तीत ट्रिप होतो ते पाहावे.
मोटर व लोड याची प्रॉपर Alignment असणे फार गरजेचे आहे , व्यवस्थित नसलेल्या Alignment मुळे मोटर चे लाईफ टाइम कमी होतेच तसेच Sudden Breakdown ( तात्काळ मधेच बंद पडणे ) या मुळे प्रोडक्शन चे मोठे नुसकान होते.
मोटर ही mechanical ऊर्जा देत असल्यामुळे तिथे Vibration ( व्हयबरेशन) साहजिकच मोठया प्रमाणात असते त्यामुळे ह्या Vibration चा परिणाम हा फौंडेशन बोल्ट loose (लुस ) होण्यावर होतो, ऑपरेटर नी याची योग्य चाचपणी करुन ते व्यवथित सु स्थितीत करणे महत्वाचे असते, त्या मुळे मोटर व लोड हा प्रॉपर Alignment मध्ये राहतो व वारंवार ब्रेकडाऊन होत नाही.
आम्ही Balaji Engineers, Kolhapur मध्ये आपल्या इलेक्ट्रिकल Equipment मधील HT Equipment , Sub Station Equipment इत्यादी साठी Maintains Service पुरवतो, अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.