Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
Points covered in this blog
हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो, चला मग आपण घेण्याचा प्रयत्न करूया घरातील,ऑफिस मधील बॅटरी आपल्याला किती वेळ backup देणार म्हणजे किती वेळ चालू राहणार लाईट गेल्या नंतर.
Uninterrupted Power Supply मिळवण्यासाठी Residential तसेच Commercial ठिकाणी Inverter चा वापर केला जातो. नेहमी Inverter चा Battery Connect केलेली असते. त्या Battery च्या Capacity वरून कळते की
Inverter किती वेळासाठी Backup देऊ शकतो.
आपण एका घराच्या उदाहरणावरून बॅटरी कॅपॅसिटी म्हणजे कितीवेळ ती चालेल हे calculete करु,
असे समजु की ,आपल्या घरी एक 150 AH ची 12V ची Battery connect केली आहे.
आपल्याला या इन्व्हर्टर बॅटरी वर फक्त 3 Fan आणि 1 Tube light सुरु करायची आहे
तर आपला connected load होईल,
Fan-60W = 60x3 = 180W
Tubelight = 120W
Total Load = 300 Watt
आपल्याला उत्तर आले 300 Watts, म्हणजे आपल्याला बॅटरी वर जोडायचा एकूण लोड आहे 300 Watts.
तर आता आपण calculate करू की 150AH, 12V ची Battery 300 W load साठी किती backup time देऊ शकते.
सुरुवातीला आपण calculate करू की Battery चा discharging current काय असेल,
आपल्याला या इन्व्हर्टर बॅटरी वर फक्त 3 Fan आणि 1 Tube light सुरु करायची आहे
तर आपला connected load होईल,
Discharging Current = (Power Load) / (Battery Voltage)
300 / 12
= 25A
Discharging Current = 25A
Discharging Current वरून आपण Battery Backup time easily calculate करू शकतो, यासाठी खालील formula वापरणार आहे ,
Backup Hrs = ( Battery AH ) / (Discharging Current)
या उदाहरणामध्ये,
Backup Hrs = ( 150 AH ) / ( 25 A )
= 6 Hrs
या दोन्ही फॉर्मुल्याच्या calculation नंतर आपल्याला उत्तर मिळाले ते 6 Hours, म्हणजे जोडलेला लोड हा 6 तास या बॅटरी वर लाईट गेल्यानंतर चालेल.
पण, Battery च्या long life आणि Durability साठी कोणतीही Battery 100% Discharge केली जात नाही.
Battery Discharging limit 70% विचारात घेतले जाते. त्यामुळे येणारा Back time असेल,
Backup Hrs = 6 x 0.7 = 4.2 Hrs.
In minutes 0.2 x 60 = 12 min
Backup hrs = 4 Hrs 12 Min
बॅटरी चा sefty फॅक्टर विचारात घेवुन आपल्याला उत्तर मिळाले साधारण पणे 4 तास.
अशा पद्धतीने वरील माहितीवरून आपण कोणत्याही Capacity च्या Battery चा Backup Hr time calculate करू शकतो.
बालाजी इंजिनिअर्स इलेक्ट्रिकल क्षेत्रात Electrical stockiest, Electrical equipment manufacturing and Electrical Contracting यामध्ये 2004 पासुन काम करते. Electrical Load Calculation, Internal Electrification, External Electrification, Electrical Inspector Permissions, Sub Station Erection, Perfect Earth Electrode अश्या Electrical services Provide करते.