Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
Electricity Generating station पासुन end consumer पर्यंत पोहचण्यासाठी आपण transmission आणि Distribution line चा वापर करतो. डिस्ट्रिब्युशन सिस्टिम मध्ये आपण supply HT आणि LT मधून ग्राहकापर्यंत पोहचतो. या Electrical blog मधे आपण पाहणार आहोत की HT आणि LT Line काय असते ?, किती wire चा वापर केला जातो?, किती voltage ला लाइन डिझाइन केलेली असते ? आणि इतर काही मुद्दे जे LT आणि HT line च्या estimation वेळी consider केले जातात.
तर सुरुवात करूया HT आणि LT च्या full form पासून,
HT - High Tension
LT - Low Tension
Tension हा French शब्द आहे ज्याचा अर्थ आहे voltage यावरून हे कळते की HT म्हणजे High Voltage आणि LT म्हणजे Low Voltage.
नेहमी line HT आहे कि LT हे त्याच्या Voltage range वरूनच ठरवले जाते. आता आपण पाहूया कि LT आणि HT line ची voltage range किती असते.
LT line च maximum voltage 1000V असते म्हणजे 1000V पेक्षा कमी voltage च्या line ला LT line म्हणतात. LT supply दोन category मध्ये available असतो single phase आणि three phase. Normally घरामध्ये single phase supply दिलेला असतो व त्याच voltage 230V असते. आणि LT three phase supply च voltage 415V / 440V असते.
11 KV, 22 KV, 33 KV voltage च्या line ला HT line म्हटलं जात. जर voltage 33 KV पेक्षा जास्त असेल तर त्या line ला Extra High Voltage (EHV) line म्हटलं जात.
आता आपण पाहणार आहोत की कोणत्या line मध्ये जास्त Faults येतात. LT line directly load ला connected असते. load च्या consumption मध्ये continuously variations येत असतात त्यामुळे line मध्ये connected equipment वर stress तयार होतो व equipment damage होण्याचे chances असतात. त्यामुळे LT line मध्ये HT line च्या comparatively जास्त faults येतात. HT line directly load ला connect नसते त्यामुळे wire/Cable /conductor वरती stress निर्माण होत नाही व कमी faults येतात.
आता आपण पाहणार आहोत, कोणते insulators HT आणि LT line मध्ये वापरले जातात. Insulators हे conductor ला supporting structure पासून isolate करण्याचे काम करतो. ज्यावेळी line सरळ direction मध्ये run होत असते, line मध्ये cut point किंवा turn point नसतात त्यावेळी pin insulators वापर केला जातो. ज्यावेळी line मध्ये cut point येतात किंवा line ची direction change करायची असते त्यावेळी disc insulator वापरले जातात . disc insulator हे strain hardware च्या साहयाने जोडले आसतात .
LT line मध्ये दोन types चे insulators वापरतात.
HT line मध्ये दोन type चे insulators वापरले जातात .
HT आणि LT line च्या current rating वरून conductor ची निवड केली जाते. हे conductors AAC, AAAC ACSR या materials मध्ये availableआहेत. Conductor च्या size आणि current carrying capacity वरून त्याचे Rabbit, Raccoon, Weasel, Dog, Panther, Zebra, Gnat, Ant असे types पडतात . वरील types मधून जी conductors size आणि current carrying capacity line साठी suitable आहे तो conductor निवडला जातो.
Normally LT line ला Star connection मध्ये distribute केले जाते त्यामुळे LT line मध्ये 4 wire ची requirement असते R, Y, B, आणि N wire.
HT Line normally Delta connection मध्ये distributed केलेली असते त्यामुळे HT Line मध्ये 3 Wire ची requirement R, Y आणि B wires . HT line Power Station पासून सुरु होऊन Pole mounted transformer पर्यंत असते. आणि LT Line Pole mounted transformer पासून सुरु होते व load ला connect केली जाते.
LT Line मधे साधारणतः 5 x 3 (125 X 75) हा पोल , तसेच PCC Cement Pole वापरले जातात . आणि HT Line करिता 11kv line मधे पोल हे 4 x 4.5 (100 x 116 ) व 22,33 kv ला 6x 6 (152 x 152) पोल वापरले जातात . असे असले तरी पोल हे geographic condition वरून सुध्हा select केले जातात .
LT Line करिता LT earthing set / LT Stay Set / Hardware लागले असते तर HT Line करिता HT earthing set / HT Stay Set / Starin Hardware हे material line वर वापरले जाते.