Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.

Balaji Engineers - Manufacturer of Electrical Equipments and Government Licensed Electrical Contractor in  Maharashtra, Karnataka, Goa, India
  • Behind Kolhapur Axle,

  • M.I.D.C., Shiroli, Kolhapur

Balaji Engineers - Manufacturer of Electrical Equipments and Government Licensed Electrical Contractor in  Maharashtra, Karnataka, Goa, India

Cable Size Selection |
केबल कशी सिलेक्ट करावी

Residential, Commercial आणि Industrial Electrification करत असताना,नेहमी केबल कोणती निवडावी हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. आपण या ब्लॉग मध्ये कोणत्या फॅक्टर चा विचार काळजीपूर्वक करावा, cable किंवा wire selection करण्यापूर्वी, हे पाहणार आहोत . तसेच येणाऱ्या पुढच्या Blog मध्ये आपण wire selection Amp rating नुसार कसे करावे हे पाहणार आहोत .

या Blog मध्ये आपण factor affecting the selection of Cable हे Points कव्हर करणार आहोत, त्यातील महत्वाचे आहेत ते,

  • Single-phase आणि Three Phase
  • Aluminium आणि Copper
  • Equipment Efficiency
  • Power Factor
  • Method of Cable laying
  • Connected Load
  • Temperature
  • Voltage Drop
  • Short circuit Current
  • Distance
  • Application of Load

हे आहेत या blog मधील discussion चे मुद्दे

चला तर मग पाहू ,आता कोणते कोणते Factors आहेत. जे नेहमी cable selection करण्यापूर्वी विचारात घ्यावेत.

1) Single-phase आणि Three Phase

आता आपण Single-phase घरातील किंवा Commercial Premises मधील wire चे selection करत असताना त्याचा वापर व जोडणारे appliances हे Single-phase असतील तर 0.5 to1 sqmm पर्यंत आपण fan, tubelight, bulb याकरिता वापरतो. Residential building मध्ये Home Appliances तसेच छोट्या Motors करीता आणि Commercial मध्ये lighting load साठी Single-phase wire चा उपयोग करतो.

Residential , Agriculture आणि commercial मध्ये सर्रासपणे त्याच्या आवश्यकते प्रमाणे Three Phase wire & cable चा उपयोग केला जातो. Agriculture आणि Industry मध्ये motor च्या load साठी, heavy load उपकरणांसाठी मुख्यतः Three phase cable चा उपयोग केला जातो.

अशा प्रकारे wire व cable selection मध्ये जोडली जाणऱ्या उपकरणावरून Cable Single-phase किंवा Three Phase ठरवली जाते.

Single-phase आणि Three Phase

2) Aluminium आणि Copper Cable

Cable चे selection करत असताना ज्या ठिकाणी minimum voltage drop असण्याची गरज असते तसेच जिथे cable ची size matter करते त्या ठिकाणी copper चा पर्याय निवडला जातो.

तुलनात्मक दृष्ट्या Aluminium Cable ही size मध्ये मोठी असते. व voltage drop हा Copper Cable पेक्षा थोडा जास्त असतो आणि ही cable आर्थिकदृष्ट्या कमी खर्चाची असते.

या वरील निकषाच्या आधारे आपण Aluminium Cable किंवा Copper Cable हा पर्याय निवडू शकतो.

Aluminum cable and  Copper cable

3) Efficiency

या cable selection च्या मुद्या मध्ये हे समजावून घेऊ की जोडल्या जाणारा load हा ज्या Equipment ला जोडला जातो त्या equipment ची जर Efficiency अतिशय चांगली असेल तर योग्य Amp rating ची cable म्हणजे योग्य sqmm capacity ची जोडली जाईल , याच्या उलट जर कमी Efficiency असेल तर तेवढ्याच लोड साठी जास्त sqmm capacity ची केबल जोडावी लागेल.

यावरून असे लक्षात येते की equipment efficiency वर सुद्धा cable size साठी depend असते .

Single-phase आणि Three Phase

4) पॉवर फॅक्टर

cable selection मध्ये power factor हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. Power Factor चा थेट संबंध cable मधुन वाहणाऱ्या current शी येतो.

System चा पॉवर factor जितका कमी असेल तितका जास्त current flow होईल , पर्यायाने जास्त sqmm capacity ची cable जोडावी लागू शकते.

या विरुद्ध जर power factor चांगला maintain (युनिटी च्या जवळ ) असेल तर योग्य current cable मधून वाहते व cable size ही कमी (Proper) वापरावी लागेल.

निष्कर्षामधे असे समजू की, केबल साईज ही Power Factor वर आधारित असते.

Aluminum cable and  Copper cable

5) Methods Of Laying Cables

मुख्यतः source पासून receiving end म्हणजे industry पर्यंत येणारी cable ही underground cable laying पद्धतीने तसेच over head cable tray या पद्धतीने वाहून नेहली जाते.

Underground मधील Cable ची sqmm कॅपॅसिटी ही Open Air method पेक्षा थोडी कमी असते.

Single-phase आणि Three Phase

6) Connected Load

आपल्याला Residential, Commercial, Agriculture किंवा Industrial Unit ला power supply देण्यासाठी त्याच्या पूर्ण electrical load ची माहिती असणे गरजेचे आहे त्यावरून आपणास Amp capacity calculate करून घरामध्ये किंवा कारखान्यामध्ये येणारी cable निवडता येईल व त्याचे वर्गीकरण पुढे Single Phase, 3 Phase, Aluminium, Copper यामध्ये करता येईल.

Load calculation हे अत्यंत तंतोतंत व बारकाईने करणे गरजेचे आहे, त्यामुळे योग्य Amp ची cable size निवडता येईल व आर्थिक नुकसानी पासून वाचता येईल.

Cable selection मध्ये connected load हा फार महत्वाचा factor आहे.

Aluminum cable and  Copper cable

7) Temperature

तापमानाचा थेट संबंध हा cable च्या sqmm size वर आहे. जास्त तापमान असणाऱ्या ठिकाणापासून cable जाणार असल्यास त्याची sqmm capacity जास्त असेल.

Single-phase आणि Three Phase

8) Voltage Drop

Cable selection करताना voltage drop हा Important मुद्दा विचारात घेतला पाहिजे. voltage drop हा मुख्यतः वाहून नेणाऱ्या cable चे अंतर व cable aluminium आहे की copper आहे यावर depend असते.

Voltage drop हा 2 to 5 % सामान्यतः व्यवहारात गणला जातो.

Aluminum cable and  Copper cable

9) Short circuit Current

short circuit current capacity वरून आपण cable कमीत कमी किती sqmm capacity ची असावी हे ठरवू शकतो. जेंव्हा short circuit होते, तेंव्हा millisecond साठी काही fault current cable मधून वाहत असतो, तो current withstand करण्याची capacity केबल मध्ये असावी, यासाठी short circuit चा मुद्दा विचारात घेतला जातो.

Short circuit current हा cable selection मध्ये विचारात घ्यावा जेणेकरून योग्य Amp rating cable निवडता येईल आणि सर्व प्रकारचे protection breaker हे short circuit fault वेळी properly operate होतील.

Single-phase आणि Three Phase

10) Distance

जेवढे जास्त आंतर आणि केबल नेहण्याची पद्धत यावर केबल चे स्पेसिफिकेशन आवलंबून असते, जितके आंतर जास्त तेव्हडा voltage Drop हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे cable selection करताना आंतर हे विचारात घ्यावे.

Aluminum cable and  Copper cable

11) Application of Load

Fan, Ac, Geyser, पासून ते, कॉम्प्रेसर, electrical panel, welding machine इत्यादी वेगवेगळ्या उपकरणांना वेगवेगळ्या specification ची cable लागते. त्याचे application वरून मुख्यतः, Single Core, 3 Core, 3.5 core, Multi Core, 19 core multi stand, copper flexible असे cable चे विविध प्रकार आपणास बघायला मिळतात.

Application व त्याची capacity यावरून cable size ही ठरवणे सोपे जाते.

Single-phase आणि Three Phase

या blog मध्ये आपण पहिले की असे कोणते कोणते घटक असतात जे wire, Cable selection वेळी विचारात घ्यावेत, Cable selection हे आपल्या electrical installation चे सर्वात महत्वाचा विषय आहे ज्या मुळे आपण योग्य selaction करुन आर्थिक फायद्यात राहु शकतो.


Balaji Engineers हे Electrical wire and Cable चे Polycab Cables, Finolex, KEI Cable या branded Cables चे Distributors and Stockiest आहोत, तसेच Industrial Electrical Internal External Electrification साठी services पुरवते.


आपण खाली दिलेल्या फोन नंबर वर व मेल आयडी वर संपर्क साधु शकता.

Our Products

Services We Offer

We Deal In

Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Polycab Wires Cables Kolhapur
Dealer Supplier Kolhapur
Dealer Supplier Raychem RPG Kolhapur
Dealer Supplier Bajaj
Dealer Supplier Crompton Greaves
Dealer Supplier ABB Kolhapur
Dealer Supplier Manisha Engineering Pvt Ltd. Kolhapur
Dealer Supplier Kirloskar Kolhapur
Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Finolex Kolhapur
Dealer Supplier JVS Electronics Kolhapur
Dealer Supplier DG Kolhapur
Dealer Supplier Atlanta Electrical Kolhapur
Dealer Supplier Densons Kolhapur
Dealer Supplier HTS Kolhapur
Dealer Supplier Elster Kolhapur
Dealer Supplier DG Kolhapur
Dealer Supplier Atlanta Electrical Kolhapur
Dealer Supplier Densons Kolhapur