Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
Diesel Generator Set हा आता आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टिम चा अविभाज्य घटक बनला आहे. DG set सध्या Industrial , commercial आणि residential आशा सर्वच ठिकाणी वापरला जातो. ज्या ठिकाणी uninterrupted supply ची गरज असते त्याठिकाणी DG set वापरून आपण continuous supply मिळवू शकतो.
उदाहरणार्थ, जर Main supply कट ऑफ झाला तर DG set वापरून आपण continuous supply दिल्यामुळे इंडस्ट्रीमधील production line continuous सुरु राहील त्यामुळे होणार आर्थिक तोटा वाचू शकतो.
आता आपण पाहूया कि एकाद्या DG set वर आपण जोडणारा लोड किती असावा. हे आपण Ampere आणि Watt नुसार सविस्तर रित्या खाली पाहणार आहोत. प्रथम आपण पाहू DG set चे Ampere rating कसे calculate करावे, Current (Ampere) rating calculate करायचा असल्यास खालील formula वापरावा लागेल,
यामध्ये, KVA = DG set capacity V = Supply Voltage √3 = हे प्रमाण Three phase load जोडला असल्यामुळे वापरले आहे.
उदाहरणासाठी आपण २५० KVA rating चा DG set घेऊ,
या उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात आले कि जे equipment आपण DG ला connect करणार आहोत त्यांची सर्वांची बेरीज हि 348 Amp पेक्षा ज्यास्त असता काम नये, जेणेकरून DG set overload होणार नाही.
आता आपण current rating calculate करून DG set ची क्षमता व त्याला जोडला जाणारा लोड किती असला पाहिजे याचे उदाहरण पहिले. आता याचप्रमाणे KW rating वरून DG set चा load calculate करण्याचे एक उदाहरण पाहूया,
उदाहरणार्थ, 250 KVA कॅपॅसिटी चा DG set आहे व त्याचा पवार फॅक्टर 0.8 आहे. तर खालील formula वरून आपण KW rating कसं calculate करावं ते पाहू,
KW = KVA X Power Factor यामध्ये, KVA = DG set capacity Power factor = DG set power factor () KW = 250 X 0.8 = 200 KW
यावरून, आपल्याला हे लक्षात आले की 250 KVA DG set ला आपण 200 KW चा लोड connect करू शकतो
ज्याप्रमाणे आपण वरील दोन्ही उदाहरणावरून KW आणि Ampere rating वरून जो connected load calculate केला तो 100% efficiency साठी केला आहे. परंतु, General Electrical Practices मध्ये equipment च्या safety व long life साठी नेहमी 80% वर run केले जाते. त्यामुळे आपण 80% लोड calculation मध्ये घेऊन equipment चा safety factor विचारात घेणे फार महत्वाचे आहे.
वरील माहितीवरून आपण कोणत्याही DG set ला जोडला जाणारा load calculate करू शकतो.
बालाजी इंजिनिअर्स इलेक्ट्रिकल क्षेत्रात Electrical stockist, Electrical equipment manufacturing and ElectricalContracting यामध्ये २००४ पासुन काम करते. DG Set Load Calculation , DG Set Installation, DG Set Electrical Inspector Permissions, DG Set Earthing अश्या Electrical services Provide करते.