Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
पाऊस पडल्यास किंवा पोल ओला झाल्यास कोणत्याही प्रकारच्या विद्युत खांबाला स्पर्श करणे टाळा.
ओले झालेली विद्युत उपकरणे वापरू नका.तसेच ओल्या हाताने कोणताही खटका (स्विचेस ) मारु नका.
जर Spark होत असेल व जाळ (ज्वाला ) मोठया प्रमाणात लागला असेल तर जवळ जाऊ नका व पाणी मारण्याचा प्रयन्त करु नका.
कारखान्यामध्ये तसेच घरामध्ये कोणतंही लहान मोठी वायर ही लुज किंवा ओपन स्वरूपात नाही ना याची खात्री करून घ्या.
वापर करुन झालेली उपकरणे बंद केली आहेत का याची खातरजमा करावी.
आपल्या कारखान्या मध्ये तसेच परिसरा मध्ये डिस्ट्रिब्युशन बॉक्स डिस्ट्रिब्युशन पॅनेल, LT मिनिपिलर, HT फोर वे, मोटर (स्टार्टर ) पेट्या, मीटर बॉक्स इत्यादी सर्वांची दारे व्यवस्थित लागली आहेत का, त्याचा दाराच्या बाजूला असणारे Cork sheet (कॉर्क शीट ) सुस्थितीत आहे का हे पाहणे गरजेचे बनते त्यामुळे पाण्याचा प्रवाह आत न गेल्या मुळे मोठा अपघात टळू शकतो.
पाऊस पडत असताना कारखान्यातील स्वीच यार्ड मध्ये एक्स्पर्ट तसेच इलेकट्रीकल मधील ज्ञान आसेले शिवाय जाऊ नका.
कोणत्याही मेटल (धातु ) नी इलेक्ट्रिकल उपकरणांना हाताळण्याचा प्रयन्त करु नये
पावसाळ्याच्या काळात कारखान्यामध्ये मालाची व इतर वाहतूक ज्याची उंची जास्त आहे व ओव्हरहेड लाईन तेथुन गेली आहे अशी शक्यतो टाळावी.
कारखाना व परिसरातील उंची असणाऱ्या झाडांच्या फांद्या ज्या ओव्हरहेड इलेक्ट्रिकल लाईन्स ना स्पर्श करू शकतात अश्या फांद्या काळजी पूर्वक तोडणे फायद्याचे ठरते, ज्यावेळी हे काम चालु असेल त्यावेळी पूर्वी विदयुत प्रवाह सम्पूर्ण बंद करावा, अडथळ्याच्या फांद्यांमुळे लाईन फॉल्ट (Line Fault ) वाढतात तसेच पावसाळ्या मध्ये सुद्धा फांद्या धोकादायक ठरु शकतात.
Technically Perfect Earthing Electrode लावलेले असल्यास Earthing हा महत्वाचा भाग कव्हर होतो व आपण आर्थिक भुर्दंड पासुन आपण वाचू शकतो. अर्थिंग रेजिस्टन्स नियमित पणे चेक करुन पाण्याच्या व्येवस्थेचे अवलोकन करावे. GI / Copper पट्टी ही घट्ट रित्या अर्थिंग electrode ला जोडली गेली आहे याची खात्री करावी.
मान्सुन पूर्व Lighting Arresters हे सुस्थितीत आहेत का बघणे फायद्याचे ठरते कारण Lighting Arresters हे आपल्या सिस्टीम चे रक्षक म्हणून काम करतात
चांगल्या प्रतीचे हॅन्ड ग्लोव्हस, टॉर्च, फायर फायटिंग Equipments, अर्थिंग रॉड्स, मेगर, अर्थ टेस्टर इत्यादी सर्व गोष्टी यॊग्य जागेवर कारखान्यामध्ये ठेवलेल्या असतील तर ते फायद्याचे ठरु शकते
मीटरिंग रूम, HT Room, स्वीचयार्ड (Switch yard ), LT Room (पॅनल ), केबल रुट, अर्थिंग पॉईंट्स, DG Room, APFC पॅनेल, MD कंट्रोलर कॉम्प्रेसर, Inventory Area of Electrical Material या सर्व व अशाच महत्वाच्या ठिकाणी ठळक आक्षरामध्ये वर्णनाचे बोर्ड लावावेत
कारखान्या मध्ये जिथे LEAKAGE ( लीकेज ) तसेच पाणी झिरपणे अशी समस्या असतील तर त्याची योग्य चाचपणी करुन ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे बनते कारण या जवळील इलेक्ट्रिकल उपकरणा पासुन धोका संभवू शकतो.
इलेक्ट्रिकल उपकरणा ची योग्य प्रमाणे Periodic Electrical Maintenance पुर्ण केला असेल तर पावसाळ्यातील Electrical Failure ची शक्यता फार कमी होते.
वेळोवेळी सर्व ऑपरेटर्स , इलेक्ट्रिकल स्टाफ यांना इमर्जन्सी Shutdown, Maintenance तसेच फायर बाबत ट्रेनिंग देणे फायद्याचे ठरते.
आपले इलेक्ट्रिकल Installation हे नेहमी अनुभवी तसेच Govt Electrical Contractor यांच्या कडुन करुन घेणे महत्वाचे आहे,
आपली इलेक्ट्रिकल Equipments ही योग्य कॅपॅसिटी ची तसेच स्टार रेटेटेड व proven Electrical Branded कंपनीची असावीत
इलेकट्रीकल बाबतीत काळजी घेणे हेच हानी पासुन वाचवणारे मुख्य सूत्र आहे.