Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
असे समजु की, मि.सुखी हा चांगला पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे १.० (युनिटी पॉवर फॅक्टर ) चा लोड जोडणार आहे .
काय होते ते पाहू ,
500 KW / 1.0 (P F) = ५०० KVA,
५०० KVA चा ट्रान्सफॉर्मर बसवावा लागेल
आता असे समजु की, मि.दुःखी हा खराब पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे ०.८ PF वैगरे चा लोड जोडणार आहे.
काय होते ते पाहू ,
500KW / 0.8 (P F) (P F) = 625 KVA,
म्हणजेच 630 KVA ट्रान्सफॉर्मर लागेल.
अश्या प्रमाणे येणारे उत्तर हे मि. सुखी ला KVA हे कमी आले आणि मि.दुःखी ते जास्त आले , या वरून हे असे लक्षात येते कि ज्या ठिकाणी खराब पॉवर फॅक्टर चा लोड जोडला असेल तर त्या ठिकाणी KVA रेटिंग वाढते व आणावे लागणारे Equipments हे जास्त (Higher) कॅपॅसिटीचे आणावे लागणार, त्यामुळे मि. दुःखी वर आर्थिक बर्डन वाढणार व याच्या उलट मि .सुखी कडून योग्य ती Equipments आणले जातील आणि त्याचा आवश्यक खर्च हा वाचला जाईल.
पुन्हा असे समजु की, मि. सुखी हा चांगला पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे १.० (युनिटी पॉवर फॅक्टर) चा मोटर ला जोडणार आहे.
I = P (W T) / V X PF तर,
10 X 1000 / 220 X 1. 0 = 10000 / 220
= 45. 45 अम्पियर
असे समजु की, मि.दुःखी हा खराब पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे 0.8 चा लोड मोटर ला जोडणार आहे
I = P (W T) / V X PF तर,
10 X 1000 / 220 X 0.8 = 10000 / 176
= 56.81 अम्पियर
अश्या प्रमाणे येणारे उत्तर हे मि .सुखी ला अम्पियर हे कमी आले आणि मि.दुःखी ते जास्त आले , या वरून हे असे लक्षात येते कि ज्या ठिकाणी खराब पॉवर फॅक्टर चा लोड जोडला असेल तर त्या ठिकाणी अम्पियर कॅपेसिटी वाढते व बसवावे लागणारे कंडक्टर तसेच केबल हे जास्त (Higher )अम्पियर कॅपॅसिटीचे आणावे लागणार , त्यामुळे मि . दुःखी ह्याला आर्थिक फटका बसणार याच्या उलट मि .सुखी कडून योग्य अम्पियर कॅपॅसिटीचे आणले जातील आणि त्याचा आवश्यक खर्च हा वाचला जाऊन फायद्यात वाढच वाढ होईल .
वीज वितरण कंपनी, ज्या वेळी १० KW लोड व (१.० PF ) असणाऱ्या कंपनीला वीज वितरित करीत असेल तेंव्हा त्यांना ४५ अम्पियर तर खराब पॉवर फॅक्टर ०. ८असणाऱ्या कंपनी ला या ठिकाणी ५७ अम्पियर करन्ट पाठवावा लागतो ( सम्पूर्ण लोड १० KW हा समान असला तरीही), सहाजिकच खराब पॉवर फॅक्टर असणाऱ्या फॅक्टरी ला लोड देण्यासाठी त्यांना त्यामानाने विजेचे जनरेशन जास्त करावे लागेल याच बरोबर जास्त कॅपॅसिटी चे विदुत साहित्य वापरावे लागेल , या साठीच वीज वितरण कंपनी ही खराब पॉवर फॅक्टर वापरणाऱ्या कंपनीना पेलेन्टी लावते.
जेव्हा 10 KW लोड असणाऱ्या दोन मोटर्स पण ज्यांचा पॉवर फॅक्टर 1.0 व 0.8 असेल त्या ठिकाणी, 0.8 ज्या ठिकाणी पॉवर फॅक्टर आहे त्या मोटर ला 57 अम्पियर करंट लागेल ज्यामुळे त्याचे कालान्तराने होणारे (मोटर च्या कॉईल इन्सुलेशन वीक होईल इ .) नुकसान हे लवकर तसेच जास्त प्रमाणात होईल .,तुलनात्मक द्रिष्टया ज्या मोटर चा पॉवर फॅक्टर 1.0 आहे व लागणारा कर्रंट हा 45 अम्पियर आहे त्याचे जीवनमान (LIFE Of EQUIPMENT) हे जास्त असेल.
या वरून असे समोर येते कि जर खराब पॉवर फॅक्टर असेल तर आपली वीज मागणी विनाकारण वाढेल व त्यासाठी वीज वितरण कपंनी ला भरावा लागणारी रक्कम सहाजिकच गरजे पेक्षा जास्त असेल (या मुळे इंडस्ट्री ला नाहक खर्चात पडावे लागेल ),जी कि जर पॉवर फॅक्टर चांगल्या प्रतीचा असेल तर योग्य तो खर्चच करावा लागेल व आर्थिक भूर्दंडा पासून मुक्तता होईल.