Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
या ब्लॉग मध्ये आपण नवीन पद्धतीने आलेल्या kVAh बिलींग विषयी माहिती करुन घेणार आहोत. प्रत्येक महिन्या नंतर येणाऱ्या बिलाकडे आपण लक्ष देवुन पाहणे व होणाऱ्या बदलाचे यॊग्य प्रमाणात छाननी करून action घेणे महत्वाचे ठरते ,जर आपला वीज वापर जास्त असेल तर आपण जास्त बारकाईने पहाणी करणे गरजेचे बनते.
kVAh बिलींग समजावुन घेण्यासाठी जर Active Power, Reactive Power, Apparent Power आणि पॉवर फॅक्टर या सगळ्यांची माहिती असल्यास kVAh बिलींग हा विषय समजुन घेण्यास सोपा जातो.
या गोष्टी मुद्देसुत एकदा कळाल्या की नेमके पुर्वी kWH बिलिंग मध्ये कशा प्रकारे बिलींग होत होते व नवीन प्रणाली मध्ये kVAh बिलींग मध्ये कोणत्या गोष्टी आंतर्भूत आहेत हे पटकन समजण्यास सोपे जाते . चला पाहु या टर्म्स व त्यांचा परिणाम.
म्हणजे जी खरोखर आपल्या वापरात येते, ज्याचा वापर आपण लाइटिंग साठी, हिट जनरेट करण्यासाठी, तसेच विविध गोष्टीना मोशन (गती) देण्यासाठी वापरतो. याचे मोजमाप kW मध्ये होते व मीटर हे ह्या वापरलेल्या पॉवरची बेरीज (kWH ) मध्ये करते. ह्या पॉवर चे जितके प्रमाण जास्त तेवढे युनिट चे commercial स्वरूपाने येणारे लाईट बिल हे योग्य प्रमाणातच येईल.
म्हणजे जी Power ही नेहमी Electromagnetic / Electrostatic फिल्ड inductive and capacitive उपकरणां मध्ये तयार करते, जशी की मोटर्स, एअर कंडिशन, फॅन इत्यादी, ही Power नेहमी kVAr (Lagg / Led ) मध्ये मोजली जाते. मीटर हे त्याची टोटल (बेरीज ) ही kVArh मध्ये करते.
Inductive loads जसे मोटर्स, इलेक्ट्रिकल Energy ही Rotational Energy मध्ये रुपातंरित होत असते तेव्हा मोटोरच्या stator and rotor अंतर (Gap) मुळे magnetic field (चुंबकीय क्षेत्र) तयार होते. अश्या magnetic field (चुंबकीय क्षेत्र ) तयार करण्यात हातभार लावणाऱ्या उर्जेला Reactive Power (रीऍक्टिव पॉवर) असे म्हणतात.
ह्या पॉवर चे जितके प्रमाण जास्त तेवढे युनिट चे commercial स्वरूपाने येणारे लाईट बिल हे जास्तच प्रमाणात येईल.
ही नेहमी kVAh मध्ये मोजली जाते, The Vector sum of active power and reactive power is called apparent power. थोडक्यात Apparent Power ही Actual पॉवर आणि reactive power (अभासी ऊर्जा ) यांची बेरीज असते. kVAh = kWH +kVArh
जर kVAh = kWH हे समीकरण सत्यात आणायचे झाल्यास आपल्याला सिस्टीम मधील kVArh म्हणजे रियाक्टिव पॉवर ही सँमूर्ण पणे घालवली पाहिजे जे करण्यासाठी आपण योग्य कपॅसिटीचे योग्य प्रमाणात कॅपॅसिटर्स बसवण्याच्या पर्यायाचा आधार घेऊ शकतो.
kWH मीटर रिडींग पद्धतीमध्ये Consumer (ग्राहकाने) वापरलेल्या Active Energy चे बिल हे kWh मीटर रिडींग प्रमाणे घेतले जाते. ज्या मध्ये fixed charges आणि other charges हे वेगळे आकारले जातात. जे kWh मीटर रिडींग येईल त्याला ग्राहक ज्या बिलिंग च्या श्रेणीत आहे त्याने गुणाकार केल्यास आलेले उत्तर हे ग्राहकाला देयक लागणारी बिलाची रक्कम असते. या बिला मध्ये पॉवर फॅक्टर च्या Incentive (प्रोसाहन पर बक्षीस) किंवा Penalty (दंड) मध्ये रेअक्टिव्ह Energy ही आधारलेली असते. तसेच जर पॉवर फॅक्टर 0.9 च्या खाली असेल तर ग्राहक कडुन Penalty (दंड) वसुल केला जातो व जर पॉवर फॅक्टर 0.95 च्या वर असेल तर Incentive (प्रोसाहन पर बक्षीस) दिले जाते.
Active (kWh) and Reactive (kVArh) दोन्ही उर्जा एकाच वेळी वापरली जातात. या मधील दोन्ही ऊर्जा स्वतंत्रपणे बिल करण्याऐवजी kVAh ऊर्जेचे बिलिंग करण्यास प्राधान्य दिले आहे. जुने kWh बिलिंग हे पॉवर फॅक्टर च्या Incentive (प्रोसाहन पर बक्षीस) किंवा Penalty (दंड) यांच्या शी संलग्न होते, पण आता kVAh बिलिंग मध्ये Incentive/Penalty हे अंतर्भुत (समाविष्ट ) केले आहे, त्यामळे दोन सेपरेट ऊर्जां चे बिलिंग करण्याची गरज उरत नाही एकटे kVAh रिडींग हे वापरलेल्या ऊर्जेचे commercial (व्यावसायिक) बिल आकारण्यास पुरेसे ठरते.
kVAh आधारित बिलिंगचा प्राइम ऑब्जेक्टिव (मुख्य हेतु) हा उर्जेची गुणवत्ता सुधारणे, सिस्टिम Stability आणणे, वोल्टेज चे प्रोफाइल सुधारणे, लाईन losses कमी करणे, हॉर्मोनिक कंट्रोल मध्ये आणणे, ओव्हर voltage, तसेच ओव्हर हिट मुळे उपकरणे तापण्या वर कंट्रोल करणे इत्यादी आहे.
आपण बिलींग च्या पद्धतीविषयी पाहिले, आपली जितकी सिस्टम सशक्त आणि चांगली तितके आपले इलेक्ट्रिकल बील हे एक्युरेट येईल, एक्युरेट येण्यासाठी पॉवर फॅक्टर, इलेक्ट्रिकल equipments ची गुणवत्ता, इलेक्ट्रिकल equipments ची कॅपॅसिटी असे अनेक घटक आपण विचारात घ्यायला हवेत.
मीटरिंग सिस्टम मध्ये पॉवर फॅक्टर हा नेहमी महत्वाची भुमिका बजावत असतो, पॉवर फॅक्टर म्हणजे पॉवर च्या क्वालिटी (गुणवत्ता) याला खुप महत्व आहे. करंट आणि voltage याच्या मधील असणाऱ्या तफावती (फरक )ला पॉवर फॅक्टर म्हणतात.
जसे आपण आपल्या पॉवर फॅक्टर च्या ब्लॉग मध्ये (सोबत लिंक देत आहे
https://bit.ly/3hWmezp) पहिलेच आहे की पॉवर फॅक्टर हा किती Energy कश्या पद्धतीने वापर होत आहे त्याचा दिशा दर्शक आहे. जर समजा 0. 85 असा पॉवर फॅक्टर असेल ,तर या मध्ये 15 % Energy हि वाया जाते म्हणजे Actual कामासाठी तिचा वापर होत नाही. या मध्ये समजा 0. 85 हा पॉवर फॅक्टर lagging स्वरूपाचा असेल तर 15 % Energy ही inductive elements कडुन वापरली जाते. आणि जर समजा 0.85 हा पॉवर फॅक्टर हा Leading (लिडिंग) स्वरूपाचा असेल तर 15 % जास्तीची Reactive Power ही capacitive elements कडुन सिस्टीम मध्ये दिलेली असते. या वरुन हे लक्षात येते की लीडिंग आणि लेगिंग पावर फॅक्टर दोन्ही पॉवर सिस्टमसाठी तितकेच हानिकारक आहेत.
ग्राहकां ना असलेल्या TOD, Tri-vector Meters, Consumer Meters यावरुन PF बद्दल माहिती मिळू शकते, पी एफ मोजण्यासाठी ग्राहक त्यांच्या एलटी पॅनेलवर पी एफ मीटर देखील बसवु शकतात. प्रत्येक individual सर्किट / मशीन / प्लांटच्या पी एफचे monitoring केले गेल्यास त्यांना "लो पीएफ विभाग" सहज ओळखता येईल आणि जिथे उणीव असेल तिथे काळजी घेता येईल.
जर पॉवर फॅक्टर lagging side असेल तर योग्य रेटिंगचे कॅपेसिटर स्थापित करुन ते सुधारले जाऊ शकते, आणि जर पॉवर फॅक्टर leading side असेल तर ते रिएक्टर स्थापित करून / योग्य रेटिंगचे जास्तीचे कॅपेसिटर काढून सुधारले जाऊ शकतात.
ग्राहकांनी लिडिंग आणि लागगिंग पॉवर फॅक्टर म्हणजे काय आणि तो प्रत्येक वेळी कसा सुधारता येईल या कडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरुन होणारा आर्थिक तोटा हा भरुन काढता येईल, जर वीज वापराचे प्रमाण हे जास्त असेल त्याच मानाने पॉवर फॅक्टर कमकुवत असेल तर नक्कीच या कडे गांभीर्याने पाहुन पॉवर फॅक्टर मध्ये सुधारणा करुन आपल्या सिस्टीमची कार्यक्षमता वाढवण्याकडे भर दिला गेला पाहिजे.
जर आपण HT Consumer या सदरामध्ये मोडत असाल तर आपल्या कडे APFC पॅनेल म्हणजे कपॅसिटर पॅनेल हे कारखान्यामध्ये नक्की बसवलेले असेल, kVAh = kWH हे करत असताना, APFC पॅनेल मध्ये 0. 999 च्या आसपास हा PF नेहण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षपुर्वक बघाव्या लागतील जश्या की
1) APFC पॅनेल हा योग्य पद्धतीने कॉन्फीगर केला आहे का
2) Minimum Load कॉन्फिगरेशन हे तपासले पाहीजे
3) स्टेप साझिंग बघितले पाहीजे
4)इलेक्ट्रिकल सर्किट चे मेंटन्स प्रॉपर केला आहे का आश्या भरपूर पॉईंट्स वर या सर्व गोष्टी आधरभुत आहेत.
बिलींग ची पध्दत आणि कारखान्यातील इलेक्ट्रिकल व्यवस्था याची चांगली सांगड घालुन चांगल्या प्रमाणे आर्थिक बचत करता येईल.
आम्ही Balaji Engineers, 2004 पासुन H T Equipment’s या क्षेत्रा मध्ये काम करत आहोत ,तसेच Huphen Metering Cubical चे Kolhapur, Ratnagiri आणि Sindhudurg चे authorised dealer आहोत, याबरोबरच Power Factor Panel चे Manufacturer आहोत, आपल्या Meter Reading संदर्भातील queries असल्यास आपण खाली दिलेल्या नंबर/ ई-मेल वर कळवु शकता.